![]() |
![]() |
WEBICE | ONGC REPORTS |
---|
आपल्या सोसायटीचे गिफ्ट वाटप थांबवण्याचा नतद्रष्टपणा करणाऱ्या
नेत्यांबद्दल खुलासा.
Karmachari Sanghatana Manifesto 2023.
कर्मचारी संघटनेची वचनपूर्ती व यशस्वीकार्य.
Loss of employees by PEU office bearers in OTA 2013.
HISTORIC MOU 2004 Revision by KARMACHARI SANGHATANA.
MOU 2004 LOSS OF EMPLOYEES BY PEU.
Interaction with EC regarding Organiatioanl Development Issues-req.
Dungarees Review by 29May2023.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आवाहन.
Credit and Thrift society 2023 election official result.
Respected C&T Society members,
On behalf of the ONGC Employees Co
Operative Credit & Thrift Society Ltd. & Karmachari Sanghatana
Mumbai, we would like to extend our heartfelt gratitude to each and
every member of C&T society who casted their valuable vote for
carrying forward the Trust & Honesty of our panel lead by Shri.
Pradeep Mayekar Sir.
The various milestones achieved in the
past many years by C&T society working with honesty and integrity
have made the present members stand firmly behind our panel.
We Sincerely thanks to all the Officers and Staff
members from Offshore, Hazira Plant, Helibase, Green Heights, VB, 11
High, Panvel, Trombay, Nhava, Uran who participated and handled the
event throughout and made the event a memorable for us.
Finally, our special thanks to all members who have made special
efforts by explaining the work of our society to all the voters
without slacking anywhere in the campaign.
With Sincere
Gratitude and Regards,
Winner Team
कर्मचारी बंधु आणि भगिनींनो,
आज सोमवार,दिनांक ०९.०१.२०२३
ओ.एन.जी.सी. (डब्लू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेच्या अभ्यासपुर्ण व अथक
प्रयत्नांती कोविड-१९ काळात दिनांक २३.०३.२०२० ते ०७.११.२०२१ पर्यंत
ओ.एन.जी.सी. उरण प्लांटमध्ये १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्ननुसार १२
तासांपैकी ३ तासांच्या ओवर टाइमच्या करारावर क्षेत्रीय श्रम आयुक्त
(केंद्रीय) - श्री.सुनील माळी साहेब यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात
आल्या.
याप्रसंगी ओ.एन.जी.सी. उरण आस्थापने तर्फे, प्रभारी -
औद्योगिक संबंध- श्री.गौरव पतंगे साहेब आणि ओ.एन.जी.सी.
(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - माननीय श्री.प्रदीप
मयेकर साहेब, उपाध्यक्ष- श्री. पराग कदम,उरण संयंत्रचे सचिव -
श्री.उज्जेश तुपे व श्री.बाळकृष्ण काशीद व कार्यकारिणी सदस्य
श्री.दिलीप आर्दाळकर उपस्थित होते.
दिनांक १७.११.२०२२ रोजी उरण
संयंत्राचे कार्यकारी निदेशक - श्री.सुबोजित बोस साहेब यांच्या
कार्यालयात कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या
मीटिंगमध्ये कोविड-१९ काळात दिनांक २३.०३.२०२० ते ०७.११.२०२१ पर्यंत
ओ.एन.जी.सी. उरण प्लांटमध्ये १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्ननुसार १२
तासांपैकी ३ तासांच्या ओवर टाइम चा मोबदला देण्याचा निर्णय संमत
करण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक ०६.१२.२०२२ रोजी
सकाळी १०:०० वा. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रथमतः मीटिंग
पार पडली होती.
दिनांक १७.११.२०२२ रोजी कर्मचारी संघटनेसोबत
झालेल्या मीटिंगमध्ये संमत झालेल्या १२ तासांपैकी ३ तासांच्या ओवर टाईम
चा मोबदला देण्याच्या निर्णयाचा श्रम आयुक्त (केंद्रीय) - मुंबई
यांच्या कार्यालयात अंतिम करार करण्यासाठी दिनांक ०६.१२.२०२२ रोजी
कर्मचारी संघटनेसोबत पार पडलेल्या मिटींग नंतर,श्रम आयुक्त (केंद्रीय)
- मुंबई यांच्या कार्यालयात अंतिम करार करण्याचे उरण आस्थापनेकडून
मान्य करण्यात आले होते.
त्यानुसार क्षेत्रीय श्रम आयुक्त
(केंद्रीय) - श्री.सुनील माळी साहेब यांच्या कार्यालयातून
कोविड-१९
काळात दिनांक २३.०३.२०२० ते ०७.११.२०२१ पर्यंत ओ.एन.जी.सी. उरण
प्लांटमध्ये १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्ननुसार १२ तासांपैकी ३ तासांच्या
ओवर टाइम चा मोबदला देण्याचा अंतिम करार करण्यासाठीचा ई-मेल कर्मचारी
संघटनेस दिनांक १३.१२.२०२२ रोजी प्राप्त झाला होता.
त्यानुसार
कर्मचारी संघटना व ओ.एन.जी.सी.,उरण आस्थापनेस, दिनांक १९.१२.२०२२ रोजी,
क्षेत्रीय श्रम आयुक्त (केंद्रीय),श्रम रक्षा भवन यांजकडे बोलावण्यात
आले होते; परंतु हाजिरा प्लांट येथील निवडणूक कार्यक्रम जाहीर
झाल्यामुळे ३ तासांच्या ओवर टाइम चा मोबदला देण्याचा अंतिम करार
निवडणूकीनंतर करु असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते.त्यानुसार आज
दिनांक ०९.०१.२०२३ ठरल्याप्रमाणे करारावर सह्या करून अंतिम
शिक्कामोर्तब झाले.
ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी
संघटनेने केलेला अभ्यासपूर्ण पत्र व्यवहार,कामगार कायद्यातील
तरतुदींनुसार ओ.एन.जी.सी. उरण आस्थापन व श्रम आयुक्त यांच्याकडे
मीटिंगमध्ये केलेला सततचा पाठपुराव्यामुळे व अंतिम करार करण्याबाबतच्या
मजकुरासाठी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी या सर्वांची आज फलश्रुती प्राप्त
झाली.
कोविड-१९ काळात दिनांक २३.०३.२०२० ते ०७.११.२०२१ पर्यंत
ओ.एन.जी.सी. उरण प्लांटमध्ये १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्ननुसार १२
तासांपैकी ३ तासांच्या ओवर टाइम चा मोबदला मिळण्यासाठी ओ.एन.जी.सी.
(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - माननीय श्री.प्रदीप
मयेकर साहेब, उपाध्यक्ष- श्री. पराग कदम व श्री. मनोहर थळी,उरण
संयंत्रचे सचिव - श्री.उज्जेश तुपे व श्री.बाळकृष्ण काशीद यांनी
घेतलेली प्रचंड मेहनत आज कामी आली.
कोविड-१९ काळातील ओव्हरटाईम
चा प्रलंबित मुद्दा आज मार्गी लागला.ओ.एन.जी.सी. उरण व्यवस्थापनाचे
मनःपूर्वक विशेष आभार.तसेच कर्मचारी संघटनेच्या या ऐतिहासिक यशामध्ये
संघटनेच्या सभासदांनी व हितचिंतकांनी संघटनेवर दाखवलेल्या
विश्वासार्हतेबद्दल कर्मचारी संघटना आपली अत्यंत आभारी आहे.
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना.
KS Achivment covid 19 Uran Overtime.
कर्मचारी बंधु आणि भगिनींनो,
काल दिनांक ०६.०१.२०२३ रोजी DA (
महागाई भत्ता ) प्रकरणाची सुनावणी आगरतळा उच्च न्यायालयाच्या
न्यायाधीशांनी केली. गेल्या अनेक सुनावणीनंतर न्यायाधीशांनी DA (
महागाई भत्ता ) प्रकरण निकाली काढले आणि पुढील ३ महिन्यांच्या कालावधीत
ओ.एन.जी.सी. मधील सर्व युनियन श्रेणीतील कर्मचारी व अधिकारी वर्गाला
महागाई भत्ता देण्याचा निर्णय आगरतळा उच्च न्यायालयाने दिला.
सदर महागाई भत्ता देण्याबाबत भारत सरकारच्या 'अवजड उद्योग आणि
सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाच्या' , 'सार्वजनिक उपक्रम विभागातर्फे'
कार्यालयीन निवेदन जारी करण्यात आले होते.त्यानुसार सदर महागाई भत्ता
HPCL,BPCL,IOCL,NPCIL इ. सार्वजनिक उपक्रमांमध्ये कधीच देण्यात आलेला
आहे. फक्त ओ.एन.जी.सी. व्यवस्थापन 'अधिकारी वर्गास' हा महागाई भत्ता न
मिळाल्याने युनियन श्रेणीतील कर्मचारी (Unionised Category Staff)
वर्गास ०१.१०.२०२० ते ३०.०६.२०२१ पर्यंतचा महागाई भत्ता देण्यासाठी
नकारघंटा वाजवत होती.
सदर बाब लक्षात घेऊन ओ.एन.जी.सी. वर्कर्स
युनियन, त्रिपुरा चे सरचिटणीस - श्री.तुसारदत्त मुजुमदार यांचे बंधू
ॲडवोकेट - तपसदत्त मुजुमदार यांनी आगरतळा उच्च न्यायालयात याचिका दाखल
केली होती.सदर याचिकेचा यशस्वीरीत्या अंतिम निकाल लागला असून, हा
ओ.एन.जी.सी. वर्कर्स युनियन, त्रिपुरा यांचा हा मोठा विजय
आहे.ओ.एन.जी.सी.(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस -
श्री.प्रदीप मयेकर साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या " पेट्रोलियम
आणि गॅस वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया " शी "ओ.एन.जी.सी. वर्कर्स युनियन,
त्रिपुरा " ही संलग्न युनियन असून, याबाबतीत श्री.प्रदीप मयेकर साहेब
यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. महागाई भत्ता देण्याबाबत
ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु) कर्मचारी संघटनेने दिनांक १८.०६.२०२१ रोजी
पत्र क्र.ONGC/KS/142/2021 व ११.०२.२०२१ रोजी पत्र क्र.ONGC/KS/83/2021
दिले होते.तसेच दिनांक २९.०६.२०२२ रोजी चेन्नई येथे ओ.एन.जी.सी.
व्यवस्थापनाबरोबर झालेल्या द्विपक्षीय सभेमध्ये (Bilateral Meeting)
All India ONGC Trade Union Coordination Committee मधील
मान्यताप्राप्त युनियन ओ.एन.जी.सी. कर्मचारी संघटनेने या मुद्द्याचा
कायम पाठपुरावा केला होता.
ओ.एन.जी.सी. वर्कर्स युनियन,
त्रिपुरा चे सरचिटणीस - श्री.तुसारदत्त मुजुमदार आणि त्यांचे बंधू
ॲडवोकेट - तपसदत्त मुजुमदार यांनी कामगारांचे न्याय्य हक्क मिळवून
दिल्याबद्दल ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेतर्फे आणि
ओ.एन.जी.सी. मधील तमाम कर्मचाऱ्यांतर्फे मनःपूर्वक धन्यवाद!
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना.
Empanelment of Apollo Hospital, Nahsik, for PME.
Blood Donation Camp 2022 dates and hospitals list.
१४ ऑक्टोबर २०२२
COVID-१९ काळात दि.२३.०३.२०२० ते ०७.११.२०२१
पर्यंत ओएनजीसी उरण प्लांट मधील करण्यात आलेल्या १२ तासांच्या शिफ्ट
पॅटर्न नुसार ४ तासांचा ओवर टाईम मिळण्याबाबत कर्मचारी संघटनेने
सर्वप्रथम व्यवस्थापनास खालील पत्रे दिली,
दिनांक ०१.०३.२०२१,पत्र क्र.ONGC/KS/90/2021
दिनांक
११.१०.२०२१,पत्र क्र.ONGC/KS/195/2021
दिनांक ०६.१२.२०२१,पत्र
क्र.ONGC/KS/224/2021
त्यानुसार दिनांक
१७.११.२०२१ रोजी उरण व्यवस्थापना सोबत मिटिंग घेण्यात आली. उरण
व्यवस्थापनातर्फे दिनांक १८.११.२०२१,पत्र
क्र.Uran/HRER-IR/KS/Misc/2021 कर्मचारी संघटनेस देण्यात आले.
दिनांक
१६.०९.२०२२ रोजी ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना आणि
क्षेत्रीय श्रम आयुक्त (केंद्रीय) - श्री.सुनील माळी साहेब यांच्या सह
ओ.एन.जी.सी. व्यवस्थापना तर्फे
महाव्यवस्थापक - प्रभारी मानव
संसाधन - सौ.भावना आठवले मॅडम, व्यवस्थापक - प्रभारी औद्योगिक संबंध-
श्री.गौरव पतंगे साहेब, सीनियर एक्झिक्यूटिव्ह - श्री.सुलतान दानिश
साहेब यांच्या समक्ष , कोविड १९- काळातील उरण प्लांट मध्ये करण्यात
आलेल्या १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्न नुसार ४ तासांचा ओवर टाईम
मिळण्याबाबत कर्मचारी संघटनेने आपली बाजू मांडली व कारखाना अधिनियम१९४८
(Factory Act 1948) मध्ये सांगितल्याप्रमाणे जर एखादा कामगार एका
दिवसामध्ये ८ तासापेक्षा जास्त वेळ काम करत असेल तर तो कामगार हा
ओव्हरटाईम घेण्यास पात्र आहे. अशी ठाम भूमिका मांडली व अशा प्रकारचा
ओवर टाइम HPCL रिफायनरी,मुंबई व BPCL रिफायनरी,मुंबई मध्ये दिला
आहे.असा संदर्भ देखील दिला. परंतु व्यवस्थापनाने आपली बाजू मांडताना
कामगारांनी एका आठवड्यामध्ये ४८ तास काम केलं आहे.अशा प्रकारचा
युक्तिवाद केला व त्यानुसार कामगार ओव्हर टाईम मिळण्यास पात्र
नाहीत,असे सांगितले.८ तासांच्या ड्युटी पॅटर्न वरून १२ तासांचा ड्युटी
पॅटर्न करताना कामगारांना विचारात घेतले होते,असाही युक्तिवाद
व्यवस्थापनाकडून करण्यात आला होता. परंतु अशा प्रकारचे कुठलाही सही
केलेला कागदोपत्री पुरावा व्यवस्थापन सादर करू शकले नाही. किंबहुना
दिनांक २२.०५.२०२० रोजी,कर्मचारी संघटना- उरणचे सचिव - श्री.उज्जेश
तुपे यांनी उरण व्यवस्थापनास ईमेल द्वारे शिफ्ट पॅटर्न पुन्हा नियमित
करण्यासाठी कळविले होते.यावर कर्मचारी संघटनेने आपली बाजू ठामपणे मांडत
कारखाना अधिनियम १९४८ (Factory Act 1948) प्रमाणे ८ तासांच्या वरील ४
तासांच्या अतिरिक्त कामाचा मोबदला न देण हे कामगार कायद्याच्या विरोधात
आहे असे सांगितले होते.क्षेत्रीय श्रम आयुक्त (केंद्रीय) - श्री.सुनील
माळी साहेब यांच्या मते कारखाना अधिनियम १९४८ (Factory Act 1948)
प्रमाणे ८ तासांच्या वरील ४ तासांच्या अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावाच
लागेल असे मत व्यक्त करण्यात आले होते.त्यानंतर क्षेत्रीय श्रम आयुक्त
(केंद्रीय) - श्री.सुनील माळी साहेब यांस कडून सदर मुद्दा युनियन व
व्यवस्थापन यांनी संयमाने सोडविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते.
या अनुषंगाने आज शुक्रवार,दिनांक १४.१०.२०२२ रोजी उरण संयंत्राचे
कार्यकारी निदेशक - श्री. सुबोजित बोस साहेब,मुख्य महाव्यवस्थापक
(उत्पादन) - प्रधान कार्यचालन - श्री.जयमोहन नायर साहेब,मुख्य
महाव्यवस्थापक (मेकॅनिकल) - प्रधान अनुरक्षण - श्री.पुगालेंदी
साहेब,मुख्य महाव्यवस्थापक (मेकॅनिकल) - प्रधान HSE - श्री.बिक्रम सिंग
साहेब,महाव्यवस्थापक (मेकॅनिकल)-आधारभूत सेवा-एम्.सी.गौतम साहेब,उप
महाव्यवस्थापक - मानव संसाधन - श्री.प्रवीण घरत साहेब,व्यवस्थापक -
प्रभारी औद्योगिक संबंध- श्री.गौरव पतंगे साहेब व ओ.एन.जी.सी.
(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - प्रदीप मयेकर
साहेब,उपाध्यक्ष - पराग कदम व मनोहर थळी,उरणचे सचिव - उज्जेश तुपे व
बाळकृष्ण काशीद,सहसचिव- राजेंद्र माळी इ. पदाधिकारी उपस्थित होते
सदर मीटिंग संयुक्तरीत्या घेण्याकरिता दोन्ही युनियनला उरण
व्यवस्थापनाकडून बोलावण्यात आले.परंतु कर्मचारी संघटनेने या गोष्टीसाठी
स्पष्ट नकार दिला असता, थोड्या वेळेसाठी प्रथम मीटिंग PEU सोबत घेऊन
पुढील मीटिंगसाठी कर्मचारी संघटनेस बोलावण्यात आले.
कर्मचारी
संघटनेसोबत दिड तास
झालेल्या प्रदीर्घ चर्चेमध्ये खालील मुद्दे
मांडण्यात आले :-
१) कोविड काळातील कर्मचाऱ्यांनी २४ तासांची
ड्युटी केलेली आहे जी कामगार कायद्याच्या विरोधात आहे.अशा २४ तासांच्या
ड्युट्या सलग पणे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आहेत.
२) उरण प्लांट
सुरळीतपणे चालवण्यासाठी त्यावेळेस फक्त ४ ओवर टाईम घेऊन बाकी सगळे
C-Off घेण्याचे युनियन कडून स्वतः मान्य केले होते.कायद्यानुसार
केलेल्या प्रत्येक ओवर टाईम चा मोबदला मिळायलाच हवा.परंतु त्या वेळच्या
परिस्थितीनुसार केवळ व्यवस्थापनाला अशा अतिशय कठीण परिस्थितीत सहकार्य
करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
३) २४ तासांची सलग ड्युटी
केल्यानंतर सुद्धा निव्वळ ३ ते ४ तासांचा आराम करून कर्मचारी कित्येक
वेळा पुढील शिफ्ट साठी रुजू झाले होते.
४) सदर ओवर टाइम Field मध्ये
प्रत्यक्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळू शकतो आणि व्यवस्थापनाला
कुठल्याही परिस्थितीत सदर ओवर टाइम नाकारता येणार नाही. असे ठाम
प्रतिपादन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले.
५) HPCL व BPCL मध्ये
अनुक्रमे ५ व ८ महिन्यानंतर शिफ्ट नियमित करण्यात आली होती.परंतु
दिनांक २२.०५.२०२० रोजी कर्मचारी संघटनेतर्फे ईमेल केल्यानंतरही शिफ्ट
ड्युटी पॅटर्न नियमित करण्यासाठी २२ महिन्यांचा कालावधी घेण्यात आला.
६) व्यवस्थापन वारंवार ओवर टाईम ची रक्कम खूप जास्त होत असल्याचे
प्रतिपादित करीत होते. परंतु प्रत्येक महिन्याची ओवर टाइम ची रक्कम
काढल्यास,ती रक्कम ३० लाखांपेक्षा जास्त होत नसल्याचे निदर्शनास आणून
दिले.
७) कोविडच्या कालावधीमध्ये कर्मचारी स्वतः वाहनांची सोय करून
कामावर येत होते,ही लक्षणीय बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली.
८) केवळ ३ C-Off हे २२ महिन्यांऐवजी ३ महिनेच देण्यात आले होते,ही बाब
देखील व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली.
९) संपूर्ण भारतात अशा
प्रकारच्या ओवर टाइम ची रक्कम दिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होण्याची
शक्यता व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आली.त्यावेळेस तोट्यात असलेल्या
आसाम प्रोजेक्ट मध्ये ओवर टाईम कसा दिला जातो याची माहिती घेण्याचे
सुचविण्यात आले.
१०) कर्मचाऱ्यांनी केलेल्या ओवर टाइम चा तपशील हा
प्रत्येक Section मध्ये आजही उपलब्ध आहे.त्यानुसार ओवर टाईम देण्यात
यावा असे प्रतिपादन कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आले.
११)
व्यवस्थापनातर्फे ४ तासांपैकी केवळ १ तासांचा ओवर टाईम देण्याचा
प्रस्ताव मांडण्यात आला.परंतु सदर बाबी कामगार कायद्याच्या विरोधात
असल्याने कामगार कायद्यानुसार अशी तडजोड करता येणार नाही असे स्पष्ट
प्रतिपादन करून कर्मचारी संघटनेने सदर प्रस्ताव नम्रपणे धुडकावून
लावला.
१२ तासांपैकी ४ तासांचा ओवर टाईम मिळणार नाही,असे
सुरुवातीला सांगणाऱ्या तथाकथित युनियनचे नेतेमंडळी ही कर्मचारी
संघटनेचे सरचिटणीस श्री.प्रदीप मयेकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील
'हिंदुस्तान पेट्रोलियम कर्मचारी सेनेच्या' प्रयत्नाने कोविड काळातील
१२ तासांपैकी ४ तासांचा ओव्हरटाईम HPCL मध्ये मिळवून दिल्यानंतर जागे
झाले.नंतर श्रेयसंधी गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून जुजबी व दिखाऊ
प्रयत्न करणाऱ्या या तथाकथित युनियन पासून सावधान.कोविड काळातील ओवर
टाईम पूर्णपणे मिळवून देण्यास कर्मचारी संघटना व्यवस्थापनाबरोबर
कोणतेही तडजोड करणार नाही.
उरण संयंत्राचे कार्यकारी निदेशक -
श्री. सुबोजित बोस साहेब यांनी HPCL ला कोविड काळातील १२ तासांपैकी ४
तासांचा मिळालेल्या ओवर टाइम शी संबंधित सर्व कागदपत्रे देण्याची
विनंती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - श्री.प्रदीप मयेकर साहेब यांस
केली आहे.दिवाळीनंतर 'ओवर टाईम' या विषयावर निर्णय घेण्यासाठी पुढील
मीटिंग मान्यता प्राप्त युनियनबरोबर घेण्यात येईल असे श्री.सुबोजित बोस
साहेब यांनी सांगितले आहे.
ओ.एन.जी.सी. व्यवस्थापन व कर्मचारी
संघटनेस येत्या १७.१०.२०२२ रोजी
कामगार
आयुक्तालय,मुंबई येथे पुन्हा बोलावण्यात आले आहे.
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना.
04 Aug 2022
Dear Friends,
Our yesterday protest was called
off after repeated requests from Management to resume meeting.
Accordingly we attended the meeting with CMD in the evening which
was inconclusive. Again today morning, Meeting continued with CMD
Ma'am in a cordial atmosphere and the following highlighted points
were agreed. More details on the points may be taken from respective
GSs.
1. Field allowances to be restored very shortly.
2.
Constitution of working group on R&P issues and convening of
preliminary meeting on R&P issues very shortly.
3. Manpower study
to be done with information sharing with respective Unions.
4.
Protection of Seniority of inter regional mutual transfers of staff.
5. Extension of medical facility to the dependent parents of retired
employees. Modalities to be shared soon.
6. Opening of W8 and S5
level for stagnated employees.
7. Extension of Covid Incentive to
staff was agreed.
8. Extension of additional financial benefit to
TBFOs who expired in line of Duty.
9. Extension of Covid
incentive to the TBFOs & Cont. Paramedics.
10. Enhancement of
mobile handset limit also agreed.
11. Convening of next JCM after
taking over by Next Director HR.
12. Safety issues exclusive
meeting agreed.
13. Additional benifit beyond CSSS for those who
expired in the line of duty.
14. Agreed to revise the White Goods
Amount and the process for the same is under consideration.
15. Principally agreed for TBFO 's age limit enhance upto 60 yrs which is currently 50 yrs.
In addition Union has also strongly expressed dissent over awarding
of O&M Contracts of production installations.
Long live
ONGC.
Long live Workers Unity
- Pradeep Mayekar
ONGC
(WOU) Karmachari Sanghatana
01 Aug 2022
कर्मचारी बंधू-भगिनींनो,
HBA surety संदर्भात
ओ.एन. जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटनेने ' JCM Agenda points'
साठी दिनांक १४.०३.२०२२ रोजी दिलेले पत्र क्र.ONGC/KS/32/2022 त्या
व्यतिरिक्त दिनांक १८.०८.२०२१ रोजी दिलेले पत्र क्र.ONGC/KS/170/2021,
तसेच ओ.एन.जी.सी. मधील सर्व मान्यता प्राप्त
युनियनची दिनांक २८ व २९.०६.२०२२ रोजी चेन्नई येथे झालेल्या Pre-JCM
मीटिंगमध्ये प्रामुख्याने HBA Surety चा नियम बदलण्याबाबत चा मुद्दा
उपस्थित करून माननीय श्री.प्रदीप मयेकर साहेबांच्या कायम पाठपुराव्याने
व प्रयत्नांती आज दिनांक ०१.०८.२०२२ रोजी व्यवस्थापनाने Amendment in
HBA Scheme च्या अनुषंगाने Surety sign. संदर्भात Office Order
(32/2022) जारी केली.
ज्या व्यक्तीच्या HBA Loan साठी आपण
Surety Sign दिलेली असेल त्या व्यक्तीने जर HBA loan Amount पूर्णतः
Repay केली असेल किंवा सदर Property ONGC कडे mortgage झाल्यावर सदर
surety पुन्हा दुसऱ्याला Surety साठी sign देऊ शकतो.
प्रदीप
मयेकर,
सरचिटणीस,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे,
ईश्वर
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील
आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य त्यांच्या परिवारास
मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली.
OO - Change in HBA Surety Rules 1Aug2022.
OO-Advisory for Travelling to Offshore by Helicopter 4Jul2022.
07 Jul 2022
कर्मचारी बंधु आणि भगिनींनो,
आयसीपी, बी&एस
मधील काही प्लॅटफॉर्म, तसेच सागर ज्योती व इतर ऑफशोअर इन्स्टॉलेशन वरून
सतत मे. सराफ केटरर्स च्या तक्रारी कर्मचारी संघटनेकडे येत होत्या. या
तक्रारींची दखल घेवून संघटनेतर्फे व्यवस्थापनाला एक पत्र दिले होते.
त्या पत्रात सराफ कॅटरर्सला भविष्यात ओएनजीसी मध्ये प्रतिबंध करावे अशी
ऑफशोअरला जाणाऱ्यांची भावना असून त्याची ओएनजीसी व्यवस्थापनाने दखल
घ्यावी अशी विनंतीवजा सूचना करण्यात आली होती. सदर पत्राच्या अनुषंगाने
आज ED - MH Asset - श्री. माथवन साहेब यांच्या दालनात ED - SM श्री.
सुबोजित बोस साहेब व GGM - HR श्री.संजीव भाटिया साहेब यांच्या
उपस्थितीत सराफ केटरर्स चे श्री.दीपक सराफ यांचेसमवेत व्यवस्थापनाने
मिटिंग आयोजित केली होती. या मिटिंगमध्ये कर्मचारी संघटनेतर्फे
सरचिटणीस मा. श्री. प्रदीप मयेकर साहेब,उपाध्यक्ष - श्री. पराग
कदम,श्री. प्रदीप म्हाडगुत व श्री. पंकज कोळी,उप- सरचिटणीस
श्री.
विजय भगत आदींनी सहभाग घेतला.
या मिटिंगमध्ये कर्मचारी संघटनेने
लिहिलेल्या पत्रातील सर्व मुद्द्यांचा विचार करण्यात आला. कर्मचारी
संघटनेतर्फे ऑफशोरची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली. अनेक गोष्टींची
सखोल चर्चा करून मे. सराफ केटरर्सला योग्य ताकीद देवून सुधारणा
करण्यासाठी एक महिन्याची मुदत व्यवस्थापनातर्फे देण्यात आली. सुधारणा न
झाल्यास त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष,
ओ.एन्.जी.सी. (डब्ल्यू.ओ.यु.)
कर्मचारी संघटना,मुंबई.
29 Jun 2022
Dear Colleagues,
Karmachari Sangathana along with ASTO and
Petroleum Employees Union met EC at Vasudhara Bhavan today and conveyed
the feelings of offshore employees.
Management has assured that an immediate audit of
PAWAN HANS will be carried out by two different agencies, only after
which any PAWAN HANS flight will be allowed for Offshore operations.
An additional compensation of 30 lakhs is being handed over to
the deceased family member including the contractual manpower by
today itself, followed by the recruitment of the dependent of
ONGCian within 15 days.
An Air insurance and compensation
policy for all the offshore going employees of ONGC with a good
amount is also under process and will be finalised within one month.
An Aviation Expert will be recruited and deputed at
Helibase, within a short period, who will be responsible for each
chopper inspection before departing for offshore.
Field
allowances will be finalised shortly as assured by the EC.
Prakash Dalvi
President
Karmachari Sanghatana..
29 Jun 2022
Dear Friends,
Updates on first bilateral
meeting held Post covid at Chennai on 29 Jun 22.Due to unfortunate
chopper accident at Mumbai Offshore it was decided to call off the
meeting. But in larger interest of employees in particular and
organisation it was decided to continue the meeting. After observing
silence in honour of the departed souls the meeting was held with
the Management on the long pending issues in a cordial environment.
The issues were deliberated thread bare and the following was agreed
to look into with positive intent.
1. Compensation for Field
going staff was discussed.
2. Payment of Covid Incentive for
staff in line with executives as per order no.
DDN/Corp-ER/Estt-Policy/2022/Lumpsum/948759 dated 29.04.2022
3.
Management agreed to examine the Payment of covid Incentive to TBFO
and paramedics on unions demand.
4. Management agreed to conduct
the initial meeting on R&P issues before JCM.
5. Regularization
and other issues of Field Operators and Contractual Paramedics were
discussed in detail.
6. Defreezing of DA for unionised employees
w.e.f 01.10.2020 to 30.06.2021.
7. Review of Fair Wage Policy
w.e.f April 2017 was discussed in detail.
8 Management has agreed
to hold JCM in the month of July.
9. Management has agreed to
look into extension of Rent Lease as agreed in 77 JCM due to non
availability of quarters in ONGC Colonies.
10. Refund for wrong
recovery of Self lease.
11. The income ceiling of Rs 72000 per
annum to be enhanced for availing of medical facility for dependent
parents.
Pradeep Mayekar
ONGC (WOU) Karmachari Sanghatana
Our
Union Achivement Re-empalment of Medicine Store chain.
KS
achivement Pending dues of contracual employees of M/s Lifejet
Cardiac Ambulance Services paid.
Strike Notice - Contractual workers wage revision.
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
दिनांक १३.०५.२२ रोजी दुपारी ०३:००
वाजता Eleven High इथे श्री साई राम (ED- Head Maint.) तसेच सर्व Rigs
चे Maintanance In charges यांच्यासोबत रिग वरील विविध समस्यां
संदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आली.
सदर मिटिंग करीता, कर्मचारी
संघटनेच्या वतीने सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर साहेब, उपाध्यक्ष श्री
पराग कदम श्री प्रदीप म्हाडगुत, उपसरचिटणीस श्री विजय भगत, श्री नवनाथ
टेमकर कार्यकारी सदस्य श्री तुषार मोरे, श्री दवणे आणि इतर पदाधिकारी
उपस्थित होते सदर मिटिंग मध्ये सर्व रिग्ससाठी डायनिंग चेअर, रूम चेअर
ऑफिस चेअर, सर्व रिग्ससाठी प्रत्येकी ३ टीव्ही सेट तसेच रिग्स वरून
आलेल्या रिक्वायरमेंट नुसार पडेस्टिअल फॅन्स, रूम फॅन्स तसेच जिम्
इक्विपमेंट, Recreation मधील व रिग वरील रूम्स मधील सोफा सेट्स इत्यादी
गोष्टींची मागणी करून येत्या एक ते दोन महिन्यात वरील गोष्टींची
पूर्तता करण्याबाबत व्यवस्थापनाकडून आश्वासन घेण्यात आले, तसेच
प्रत्येक रिगवरील समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली.
सदर मागण्यांची
दाखल घेत श्री साई राम साहेबांनी वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण
करण्याची खात्री दिली.
आपला नम्र,
प्रकाश दळवी
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटना.
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटनेने
दि. ०८.०१.२०२१ रोजी दिलेले पत्र क्र.ONGC/KS/78/2021 व कायम
पाठपुराव्यामुळे,मुंबईच्या पूर्व उपनगरातील,चेंबूर येथील Zen Hospital
ONGC च्या पॅनल वर घेण्यात आले आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय सेवा
सुविधांनी सुसज्ज असणारे हे रुग्णालय ओएनजीसी कर्मचाऱ्यांसाठी दिनांक
०१.०४.२०२२ पासून Indoor Treatment साठी ओएनजीसी मुंबईच्या सर्व
वैद्यकीय विभागाकडून Credit Authorization Letter उपलब्ध करून देण्यात
येईल.
https://www.zenhospital.in/about-hospital/
🚩
कर्मचारी संघटना जिंदाबाद! 🚩
KS Achievement - ZEN Hospital Empanelment.
Offshore strike 28 & 29 detail programme.
Strike Slogan and Banner DOWNLOAD
& PRINT
११ मार्च २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक ११/०३/२०२२
रोजी, दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांमध्ये
COVID - १९ च्या सद्यस्थितीतील पार्श्वभूमीवर ऑफशोर मध्ये कार्यरत
कर्मचार्यांचे हॉटेलमधील विलगीकरण व RTPCR चाचणी रद्द करण्यासंदर्भात
वसुधारा भवन येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
व्यवस्थापनातर्फे श्री.माथवन साहेब (ED - MH Asset),श्री. रवि शंकर
साहेब (ED-B&S Asset), श्री.मजुमदार साहेब (ED - Neelam & Heera
Asset), श्रीमती माधुरी कलिता मॅडम (GM- I/c Medical Services) व
श्री.विवेक झीणे साहेब (GM - I/c - IR) आणि कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस
- श्री.प्रदीप मयेकर साहेब,उपाध्यक्ष श्री.पराग कदम, श्री.प्रदीप
म्हाडगुत व श्री.पंकज कोळी,उप-सरचिटणीस श्री.विजय भगत व श्री.नवनाथ
टेमकर,ऑफशोर सचिव श्री.प्रशांत भावसार आणि श्री.राजेंद्र मोरे उपस्थित
होते.
COVID - १९ चा अत्यल्प प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने
दिलेल्या निर्बंधातील सूट पाहता दि.१४.०३.२०२२ पासून ओएनजीसी, मुंबई
व्यवस्थापनाने ज्यांचे COVID - १९ च्या लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण
झालेत अशा सर्व ऑफशोरला जाणाऱ्या ओएनजीसी कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलमधील
विलगीकरण व RTPCR चाचणी ची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र
अश्या सर्व जणांची हेलिबेस येथे ओएनजीसी डॉक्टर्स कडून चाचणी करून
ऑफशोरला पाठविण्यात येईल.
ज्यांचे COVID - १९ च्या लसीकरणाचे दोन
डोस पूर्ण झाले नाहीत त्यांच्यासाठी १ दिवसाचे हॉटेलमधील विलगीकरण आणि
RTPCR टेस्ट कायम ठेवण्यात आली आहे.
आपला नम्र,
प्रकाश दळवी
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी
संघटना.
१० मार्च २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी
संघटनेने दिनांक ०७.०३.२०२२ रोजी दिलेले पत्र क्र. ONGC/KS /MAR/ 2022/02
नुसार दिनांक ०८.०३.२०२२ रोजी दुपारी ०२:३० ते ०५:३० वा. पर्यंत
कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कॅन्टीन कमिटी सभासद आणि उरण व्यवस्थापन
यांच्यामध्ये आगामी नवीन कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट संदर्भात सखोल चर्चा पार
पडली.
सदर मिटिंग मध्ये उरण व्यवस्थापनाकडून , महाव्यवस्थापक -
I/c -HR/ER श्री.जॉर्ज विल्यम केरकेट्टा साहेब, व्यवस्थापक - I/c-IR
श्री.गौरव पतंगे साहेब व HR Executive श्री.विशांत राणा साहेब तसेच
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटनेचे संघटनेचे सरचिटणीस - श्री.प्रदीप
मयेकर साहेब, उपाध्यक्ष - श्री. पराग कदम साहेब व श्री.मनोहर थळी
साहेब, उरण संयंत्र चे सचिव - श्री.उज्जेश तुपे साहेब व श्री. बाळकृष्ण
काशीद साहेब व श्री राजेन्द्र माळी, श्री.सौरभ कुलथे, श्री.विजय वाघ,
श्री आशिष औसेकर हेदेखील उपस्थित होते.
सदर मिटिंग मध्ये आगामी
नवीन कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट संदर्भातील सुधारणा आणि सद्यस्थितीत असणाऱ्या
समस्या कशा प्रकारे दूर करण्यात येतील या संदर्भात सखोल चर्चा
झाली.आगामी नवीन कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट सर्व तरतुदी योग्य रीतीने मांडून
त्यातील त्रुटी सर्वदूर करण्यात येतील याबद्दल उरण व्यवस्थापनाने
ग्वाही दिलेली आहे.तसेच कर्मचारी संघटनेकडून कॅन्टीन संदर्भात अमुलाग्र
सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ज्याद्वारे उरण मधील
कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रतीची कॅन्टीन सुविधा पुरवण्यात येतील व सदर
बाबींचा कर्मचारी संघटनेकडून सकारात्मक पाठपुरावा चालू आहे.
मनोहर थळी उज्जेश तुपे
बाळकृष्ण काशीद
उपाध्यक्ष
सचिव
सचिव
Sports Selection Director offshore trophy 21-22.
Notice SLS Morcha for Secutech Automation employee.
११ फेब्रूवारी २०२२
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना
(मान्यताप्राप्त युनियन)
COVID-१९ काळात दि.२३.०३.२०२० ते ०७.११.२०२१ पर्यंत ओएनजीसी उरण प्लांट
मधील करण्यात आलेल्या १२ तासांच्या शिफ्ट पॅटर्न नुसार ४ तासांचा ओवर
टाईम मिळण्याबाबत कर्मचारी संघटनेने सर्वप्रथम व्यवस्थापनास खालील
पत्रे दिली,
दिनांक ०१.०३.२०२१,पत्र क्र.ONGC/KS/90/2021
दिनांक ११.१०.२०२१,पत्र क्र.ONGC/KS/195/2021
दिनांक
०६.१२.२०२१,पत्र क्र.ONGC/KS/224/2021
त्यानुसार दिनांक
१७.११.२०२१ रोजी उरण व्यवस्थापना सोबत मिटिंग घेण्यात आली. उरण
व्यवस्थापनातर्फे दिनांक १८.११.२०२१,पत्र
क्र.Uran/HRER-IR/KS/Misc/2021 कर्मचारी संघटनेस देण्यात आले. दिनांक
०६.१२.२०२१ रोजी रिजनल लेबर कमिशनर (RLC) ला देण्यात आलेल्या
पत्रानुसार आज दिनांक १०.०२.२०२२ रोजी Assistant Labour Commissioner -
सौ.करुणा श्रीबाद मॅडम, ALC-II यांच्या दालनामध्ये ८ तासानंतर ४ तास
अधिक काम केलेल्या कामाचा ओवर टाइम मिळण्यासाठी कर्मचारी संघटनेतर्फे
आग्रही भूमिका मांडण्यात आली.अशा प्रकारे ४ तासांचा ओवर टाईम HPCL
रिफायनरी व BPCL रिफायनरी मध्ये देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.
फॅक्टरी ॲक्ट च्या कायद्यानुसार दिवसा ८ तासांची पाळी ठरविण्यात आलेली
आहे व ८ तासांनंतर च्या कामाच्या ओवर टाईम ची मागणी ही कायद्यानुसारच
आहे,हे ठामपणे मांडण्यात आले.
माननीय असिस्टंट लेबर कमिशनर
यांनी व्यवस्थापनाला १९ महिन्याच्या झालेल्या ओवर टाइम बद्दल संपूर्ण
हिशोब (Calculation) करण्यास उपस्थित ओएनजीसी अधिकाऱ्यांना सांगितले
आहे. सदर Calculation उरण मधील कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी
share करण्यास सांगितले आहे.
आज पार पडलेल्या मिटिंगचा
इतिवृत्तांत (MINUTES) आपल्या माहितीसाठी येथे देत आहोत.
माननीय
श्री.प्रदीप मयेकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्तान
पेट्रोलियम,मुंबई रिफायनरी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कर्मचारी सेना
यांच्या ८ ते ९ महिन्यांच्या अथक प्रयत्नाने COVID - १९, काळातील ४
तासांचा ओवर टाईम HPCL च्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२१ च्या
पगारामध्ये मिळवून देण्यात आला.सुमारे ८ कोटी रुपयांची धनराशी HPCL
कर्मचाऱ्यांना ओवर टाईम साठी देण्यात आली.
ओएनजीसी
व्यवस्थापनातर्फे
श्री.जहीर अहमद साहेब - Chief Manager - HR/IR,
श्री.राजेंद्र जाधव साहेब - Manager - HR/IR, श्री.गौरव पतंगे साहेब -
Senior HR Executive, श्री.दानिश सुलतान साहेब - HR Executive व
कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - श्री.प्रदीप मयेकर साहेब,उपाध्यक्ष -
श्री.पराग कदम साहेब,सचिव - श्री.उज्जेश तुपे उपस्थित होते.
माननीय असिस्टंट लेबर कमिशनर यांनी पुढील मिटिंग दिनांक ०९.०३.२०२२
रोजी, दुपारी ०३:०० वाजता आयोजित करण्याचे योजिले आहे.कोविड -१९
काळातील केलेल्या ४ तासांचा ओवर टाईम (OT) मिळेपर्यंत कर्मचारी संघटना
सदैव प्रयत्नशील असून कर्मचाऱ्यांनी विवेकबुद्धीने सुज्ञता बाळगावी.
आपला नम्र,
प्रकाश दळवी
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी
संघटना.
02Feb22>Modified SOP for Crew change in Mumbai Offshore amidst
COVID-19 pandemic.
02Feb22> Record notes on Quarantine and Hotel Food.
१ फेब्रूवारी २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक
०१/०२/२०२२ रोजी, दुपारी ०४:०० वाजता व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना
यांमध्ये
COVID- 19 व Omicron च्या सद्यस्थितीतील पार्श्वभूमीवर
ऑफशोर मध्ये कार्यरत कर्मचार्यांचा ७ दिवसांचा विलगीकरण कालावधी
(Qurantine Period) कमी करण्यासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आली
होती.
व्यवस्थापनातर्फे श्री.माथवन साहेब (ED - MH Asset) , श्री
रवि शंकर साहेब (ED-B&S Asset), श्री.मजुमदार साहेब (ED - Neelam &
Heera Asset), श्री.सुनील सिंग साहेब (ED-HRO),सौ.माधुरी कलिता मॅडम
(GM- I/c Medical Services) व श्री.विवेक झीणे (GM - I/c - IR) आणि
कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस - श्री.प्रदिप मयेकर साहेब,उपाध्यक्ष
श्री.पराग कदम, प्रदीप म्हाडगुत व श्री.पंकज कोळी उप-सरचिटणीस विजय
भगत, श्री.नवनाथ टेमकर आणि चिटणीस श्री प्रशांत भावसार उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीला अनुसरून श्री प्रदीप मयेकर साहेबांनी ठामपणे
व्यवस्थापनाला सांगितले की, कर्मचाऱ्यांनी ऑफशोर ला जाण्याअगोदर घरून
३६ तास आधीच्या RTPCR टेस्टला मान्यता देण्यात यावी.
व्यवस्थापनाने
सद्य परिस्थितीत तीन दिवसांचा Quarantine कालावधी पूर्ववत करण्याचा
निर्णय घेतला आहे. कर्मचारी संघटनेने सुचविलेल्या या पर्यायाचा पुढील
दहा दिवसांनी फेरआढावा मीटिंग घेऊन विचार करण्यात येईल असे आश्वासित
करण्यात आले आहे.
सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर साहेबांकडून पुढील
कार्यवाहीसाठी खालील सूचना करण्यात आल्या.
१) हॉटेलमध्ये
दिवसातून दोनवेळेस सकाळी आणि दुपार नंतर RTPCR टेस्ट ची व्यवस्था
करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची टेस्ट आलेल्या
दिवशीच होईल.
२) RTPCR टेस्ट करण्यासाठी टेस्ट करणाऱ्या लॅब ची
संख्या वाढविण्यात यावी.
३) एकाच दिवशी येणाऱ्या स्टाफ
कर्मचाऱ्यांना एकाच हॉटेल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात यावा
जेणेकरून RTPCR टेस्ट घेणे सोयीचे होईल हाच निर्णय ऑफिसर हॉटेल
संदर्भात सुद्धा घेण्यात यावा.
४) ऑफशोर ला जाणाऱ्या
कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचा ७ दिवसांचा मेनू ठरविण्यात यावा आणि तो
काटेकोरपणे पाळण्यात यावा. (Quarantine कालावधी जास्तीत जास्त ३
दिवसाचाच आहे)
सदर मेनू ठरवताना हॉटेल व्यवस्थापना सोबत होणाऱ्या
मीटिंग मध्ये मान्यताप्राप्त युनियनचा जाणीवपूर्वक सहभाग असावा.
५)
पहिल्या दिवशी हॉटेलला रिपोर्ट करून RTPCR टेस्ट झाल्यानंतर
दुसऱ्याविषयी टेस्ट रिझल्ट निगेटिव्ह आल्या नंतर त्याच दिवशी
कर्मचाऱ्यांना ऑफशोर ला पाठवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
व्यवस्थापनाने ही मागणी मान्य केली आहे.
६) हॉटेलमध्ये फक्त I-card
दाखवल्यानंतर RTPCR टेस्ट घेण्यात यावी, ही मागणी व्यवस्थापनाने मान्य
केली आहे.
७) कायमस्वरूपी कामगारांसोबत ३ दिवसांचा Quarantine
कालावधी कंत्राटी कामगारांना सुद्धा मान्य करून घेण्यात आला आहे.
पुढील फेरआढावा मीटिंग दहा दिवसानंतर घेण्यात येईल.
संपूर्ण ऑफशोर
मधील कर्मचारी आणि अधिकारी देत असलेल्या सहकार्याबद्दल कर्मचारी संघटना
शतशः आभारी आहे.
आपल्या सुविधा हेच आमचे ध्येय आणि ध्यास.
आपला नम्र,
प्रकाश दळवी
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी
संघटना.
२२ जानेवारी २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक २१.०१.२०२२, रोजी आपल्या आस्थापनेतील ११ हाय याठिकाणी
सर्विसेस चे GGM श्री. साईराम साहेब यांच्या सोबत ड्रिलींग रिगवरील
कामास उपयुक्त यंत्रसामुग्री तसेच इतर उपयुक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची
ची सध्याची परिस्थिती, नवीन पुरवठा, या बाबत गंभीर चर्चा झाली. यात
कर्मचारी संघटनेचे मान्यवर मुख्य सचिव श्री. प्रदीप मयेकर साहेब तसेच
त्यांच्या सोबत कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप म्हाडगुत ,
उपाध्यक्ष श्री पराग कदम, ऑफशोअर सेक्रेटरी श्री. सुनील चिटणीस, ऑफशोअर
सेक्रेटरी श्री. प्रशांत भावसार ,सह सचिव श्री. प्रफुल्ल शेट्ये ,
श्री. परिक्षीत माळी, श्री. अशोक राजगुरू , श्री. रमेश राऊळ, श्री.
ललित तावडे, श्री. अनिल बागवे इत्यादी उपस्थित होते. सागर रत्ना , सागर
उदय, सागर ज्योती , सागर किरण, सागर गौरव इत्यादी ड्रिलींग रिगवरील
क्रेन , रिगफ्लोअर, ईझी टाॅर्क, रफनेक,पाईप स्पिनर,स्कालपर, मेस मधील
भट्टी, टिव्ही, सोफासेट, चेअर्स इत्यादी सर्व उपयुक्त विषयांवर फारच
सकारात्मक चर्चा झाली, पुन्हा पुढील महिन्यातील मिटिंगपुर्वी बरीच
सुधारणा दिसेल या आश्वासना सोबत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली व सर्व
अडचणी मॅनेजमेंट कडून नमुद करुन घेण्यात आले. आपले लाडके मार्गदर्शक
माननीय श्री प्रदीप मयेकर साहेब यांच्या केवळ आग्रही भूमिकेमुळे आणि
श्री साईराम साहेब यांच्या प्रामाणिक पाठिंब्यामुळे हे सर्व शक्य झाले
आहे.
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटना.
१८ जानेवारी २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
आज वसुधारा भवन येथे इडी एमएच असेट श्री. माथवन साहेब यांचे
अध्यक्षतेखाली इतर असेटचे ईडीज व इडी एचआरओ, इंचार्ज मेडिकल, इंचार्ज
आय आर यांच्या उपस्थितीत ऑफशोरसाठी सिलेक्ट केलेली हॉटेल्स, तेथील
प्रॉब्लेम्स व क्वारेंटाईन पिरियड यावर विचार विनिमय करण्यासाठी
युनियन्स व ASTO यांच्यासोबत मिटींग घेण्यात आली. सदर मिटींगमध्ये
खालील निर्णय घेण्यात आले.
1. हॉटेल जिंजर बाबत चर्चा करून असे
ठरविण्यात आले की यापुढे कोणालाही हॉटेल जिंजर मध्ये पाठविण्यात येणार
नाही.
2. हॉटेल vits मधील पाण्याचा कोटा वाढविण्यात आला असून आता
तेथे अधिक पाणी देण्यात येईल तसेच सकस आहार देण्याचे मान्य करण्यात
आले.
3. टेस्ट करण्यासाठी हॉटेल बदलावे लागते यावर युनियन तर्फे
आक्षेप घेण्यात आला. सदर समस्येबाबत योग्य कार्यवाही करून ही पद्धत
बदलण्याचे मान्य केले.
4. ऑफशोरला जाणाऱ्यांचा क्वारेंटाईन कालावधी
सात दिवसांहून कमी करण्यासाठी एसओपीत बदल करून निर्णय घेण्यासाठी आठ
दिवसांनी रिव्ह्यू मिटींग घेऊन आढावा घेण्यात येवून निर्णय करण्याचे
मान्य करण्यात आले.
5. यापुढे हॉटेल पॅनेलवर घेताना मान्यताप्राप्त
युनियन व ASTO प्रतिनिधींना कमिटीत घेण्याचे मान्य करण्यात आले.
6.
कोविडमुळे मृत पावलेल्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी
देण्याचे घोषित केले तरी मागील दिड वर्षापासूनच्या केसेस प्रलंबित
आहेत, ही वस्तुस्थिती मुंबई व्यवस्थापनाच्या ध्यानी आणून देण्यात आली.
त्यावर दिल्ली येथील वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यासाठी असेट मॅनेजर्स व
एचआरओ यांना विनंती करण्यात आली. ती त्यांनी मान्य केली.
या
मिटींगमध्ये कर्मचारी संघटनेतर्फे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर,
उपाध्यक्ष श्री. पराग कदम, श्री. प्रदीप म्हाडगुत व उपसरचिटणीस श्री.
नवनाथ टेमकर यांनी चर्चेत भाग घेऊन ऑफशोर कर्मचाऱ्यांची बाजू मांडली.
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटना.
५ जानेवारी २०२२
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
COVID- 19 व
Omicron च्या सद्यस्थितीतील पार्श्वभूमीवर ऑफशोर मध्ये कार्यरत
कर्मचार्यांच्या स्वास्थ्य व सुरक्षिततेचे धोरणात्मक निर्णय
घेण्यासंदर्भात कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री.प्रदीप मयेकर साहेब
यांच्याशी व्यवस्थापन गेले २-३ दिवस संपर्कात होती. परिस्थितीनुरूप
काही बदल करावयाचे झाले तरी १४ दिवसानंतर च्या Duty चा Overtime
देण्याचे श्री.प्रदीप मयेकर यांज कडून निष्ठुन सांगण्यात आले.सदर
गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यासाठी कर्मचारी संघटनेने
सोबत मीटिंग आयोजित करण्याचे श्री.प्रदीप मयेकर यांच्याकडून सूचित
करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज दिनांक ०५/०१/२०२२ रोजी, दुपारी
०३:०० वाजता व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांमध्ये मिटिंग पार पडली.
व्यवस्थापनातर्फे श्री.माथवन साहेब (ED - MH Asset) , श्री रवि शंकर
साहेब (ED-B&S Asset), श्री.मजुमदार साहेब (ED - Neelam & Heera
Asset), श्री.सुनील सिंग साहेब (ED-HRO),श्री.पी.केशव राव साहेब
(GGM-LM- Drilling),सौ.माधुरी कलिता मॅडम (GM- I/c Medical Services) व
श्री.विवेक झीणे (GM - I/c - IR) आणि कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष
श्री.पराग कदम व श्री.पंकज कोळी व उप-सरचिटणीस श्री.नवनाथ टेमकर
उपस्थित होते.
सद्यपरिस्थितीला अनुसरून मागील प्रमाणेच
२८ दिवसांचा ऑफशोर ड्युटी पॅटर्न करण्यात आला आहे व हा पॅटर्न २
महिन्यापर्यंत असेल. तसेच विलगीकरण कालावधी (Quarantine Period) हा ७
दिवसांचा (५ दिवस Quarantine + ६ व्या दिवशी चाचणी + ७ व्या दिवशी Crew
Change ) असेल.त्यानंतर परिस्थितीनुरूप पुढील योग्य निर्णय घेण्यात
येईल.
सध्या हॉटेलमध्ये विलगीकरणात (Quarantine) असणाऱ्या Crew
चा केवळ Crew Change होईल. पुढच्या Crew Change ला योग्यवेळी
बोलावण्यात येईल.
सदर स्थितीला अनुसरून करण्यात आलेले बदल
पाहता, ' पूर्वीप्रमाणेच १४ दिवसानंतर केलेली Duty ही कायद्याप्रमाणे
Over Time गृहीत धरून १२ तासांचा Over Time देण्यासंदर्भात ठाम भूमिका
कर्मचारी संघटनेतर्फे मांडली व याबाबत पूर्वीप्रमाणेच कोणतीही तडजोड
केली जाणार नाही ' असे प्रतिपादन करण्यात आले.
COVID -19 च्या
गांभीर्यतेचे स्वरूप लक्षात घेऊन पूर्वीप्रमाणेच Crew Change साठी
व्यवस्थापनाने बसची सोय उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार मांडला.
कर्मचारी संघटनेने दिनांक २२.११.२०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक
ONGC/KS/214/2021 नुसार हॉटेल VITS ची अपुऱ्या आहार देण्यात आल्या
बद्दल तक्रार करण्यात आली होती त्यावेळी ONGC चे 10 अधिकारी आणि
कर्मचारी करोना बाधित असल्यामुळे हॉटेलमध्ये दाखल करण्यात आले होते. या
पुढे हॉटेलमध्ये विलगिकरणात (Hotel Quarantine) ठेवायचे झाल्यास योग्य
पोषक आहाराची सोय करण्यात यावी यासाठी कर्मचारी संघटना आग्रही राहिल,
अन्यथा करोना बाधित कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच दाखल करण्यात यावे
अशा सूचना कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आल्या.
कोविड ची लक्षणे
सौम्य असल्यास स्वतःच्या घरी विलगिकरणात ठेवण्याच्या सूचना देण्यात
आल्या.घरी सोय नसल्यास हॉटेल अथवा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या सूचना
देण्यात आल्या.
आत्ताच प्राप्त तक्रारीनुसार हॉटेल विलगीकरणात
असणाऱ्या एका हॉटेल कडून Bisleri च्या एका पेयजल बाटलीसाठी रु.५०/-
आकारण्यात येत होते.ही बाब व्यवस्थापनाच्या लक्षात आणून देताच, सदर
बाबतीत योग्य कार्यवाही होऊन तक्रार दूर करण्यात आली.
प्रकाश
दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)कर्मचारी संघटना.
Corp IR email on 22 Nov> Representation from recognised union Reg.
Safety Shoe committee.
२२ नोव्हेंबर २०२१
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
सर्वांना सूचित करण्यात येते की, ओएनजीसी व्यवस्थापनाने आपल्या मागणीची
दखल घेऊन हेड क्वार्टर दिल्ली येथून मुंबई रिजन तर्फे मान्यताप्राप्त
युनियनच्या प्रतिनिधीचे नाव सेफ्टी कमिटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी
मागविण्यात आले. कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मा. श्री. प्रदीप मयेकर
यांचे नाव युनियनतर्फे सुचविण्यात आले व त्यानुसार मा. हेड एचआरओ व
इंचार्ज आय आर यांनी मा.श्री. प्रदीप मयेकर यांचे नाव सदर सेफ्टी शूज
कमिटीमध्ये समाविष्ट करण्यासाठी हेड क्वार्टर ला पाठवले.
यामुळे
युनियनतर्फे घोषित करण्यात आलेला उद्या करावयाचा हंगर स्ट्राईक रद्द
करण्यात आला आहे.
आपण सर्वांनी विषयाचे गांभीर्य ओळखून युनियनला
दिलेल्या सहकार्याबद्दल आपले सर्वांचे आभार व अभिनंदन.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
Our achivement new food boxes for offshore 24 Oct 2021.
AIOTUCC24 Point letter to DHR. Regarding convening of urgent meeting on Long Pening Issues.
Demonstration photos PDDU Urja Bhawan 20 Sep 2021.
२० सप्टेंबर २०२१
कर्मचारी बंधू आणि भगिनींनो,
कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांसाठी अनेक महिने
मीटिंगसाठी वारंवार मागणी करूनही व्यवस्थापनाने दखल न घेतल्याने माननीय
श्री.प्रदिप मयेकर साहेब यांच्या नेतृत्वासह इतर मान्यताप्राप्त
युनियनचे सरचिटणीस यांनी एकमताने ठरवून स्वखर्चाने दिल्लीला आज दिनांक
२०.०९.२०२१ रोजी एकत्रित येऊन ओएनजीसीच्या,पंडित दीनदयाल उपाध्याय
भवन,दिल्ली येथे निदर्शन व धरणे दिले.
सदर बाबींची ओएनजीसी
व्यवस्थापनाने दखल घेतली असून उपस्थित मान्यताप्राप्त युनियनच्या जनरल
सेक्रेटरींना चर्चेसाठी बोलावले आहे. मान्यताप्राप्त युनियनच्या जनरल
सेक्रेटरींची आपसात व व्यवस्थानाबरोबर होणाऱ्या मिटिंगची माहिती आपणास
कळविण्यात येईल.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
ऑफशोरला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विलगीकरण कालावधी (Quarantine Period)
कमी करण्याबाबत
कर्मचारी संघटनेच्या दि. २६/७/२०२१ रोजी दिलेल्या
पत्र क्र. १५ नुसार व दि. १० ऑगस्ट २०२१ वसुधारा भवन येथे सर्व
ॲसेटच्या ED समक्ष झालेल्या मीटिंग नंतरही
कर्मचारी संघटनेचे
सरचिटणीस श्री प्रदीप मयेकर साहेब सदर विषयाचा पाठपुरावा करण्याबाबत
Headquarters, देहरादून यांच्याशी सतत संपर्कात होते. त्याबाबतचा
अपेक्षित निर्णय प्राप्त झाला असून आज दिनांक १७.०९.२०२१ रोजी ओएनजीसी,
मुंबई व्यवस्थापनाने याबाबतची SOP जारी केली आहे.
१ ला दिवस :-
नियुक्त केलेल्या हॉटेलमध्ये Checkin
२ रा दिवस:- पहिल्या दिवशी
हॉटेलमध्ये Checkin केलेल्या Crew ची RT-PCR Test करणे.
३ रा
दिवस:- RT-PCR Test 'Negative' आल्यास कर्मचाऱ्याचा manifest बनवून
Offshore Duty ला पाठवणे.
उपरोक्त बाब Hotel मध्ये Checkin
करण्याच्या कमीत कमी१५ दिवस अगोदर COVID-१९ ची दोन्ही लस घेतलेल्या
ओएनजीसी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
ONGC CTD circular
>Exemption in respect of expenditure Incurred on COVID-19 treatment
of employees .
B&S
Union flowup achived procuremnt of Trend Mill Bed Mattress Pillow
cover linen items.
SHREE GANESHOTSAV 2021 Western Offshore Unit.
NOTICE> C&T Society AGM 7th September 2021 5:30 PM NBP Green Heights
ENGLSH & MARATHI.
If lancer shoes problem, forward complaint to Union Office.
Society Titan watch requirment form.
ओ.एन.जी.सी. एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट ॲंड थ्रिफ्ट सोसायटी लिमिटेड.
आदरणीय सदस्यों,
उक्त सोसायटी की ३९वीं दिनांक ०७ सितम्बर
.२०२१ को आयोजित वार्षिक आमसभा का फलित संक्षेपमे।
आम सभा मे
विचार विनिमय पश्च्यात संस्था के सदस्यों के हित में निम्नलिखित निर्णय
लिए गए ।
१) अधिकतम कर्ज सीमा ₹१० लाख से ₹१२ लाख। (नियमों के
अधीन)
२) पुराने और नए कर्ज पर १ सितंबर से ब्याज दर ८% प्रति
वर्ष की दर से। (पुराना ब्याज दर ११% ) .
३) वित्तीय वर्ष
२०२०-२०२१ के लिये लाभांश (डिवीडंट) १५% थ्रिफ्ट फंड पर ब्याज ८%
।
भुगतान दिनांक ०९ सितम्बर २०२१ से आपके बैंक खाते में एनईएफटीसे क्रमश
जमा किया जाएगा।
४) अप्रेल २२ से पहले सदस्योंको उपहार (गिफ्ट)
का वितरण
।
५ ) पिछले शेष उपहारोंकी खरीद लागत से १५% छूट पर बेचने
करने की स्वीकृती। जो इन घड़ियों को खरीदना चाहते हैं, वे सभी २०
अक्तुबर २०२१ तक आवेदन पत्र सोसायटी कार्यालय मे जमा करे।
विशेष नोट:आयकरके नियम अनुसार अगर सदस्यका डिवीडंट ५००० से ज्यादा हो
तो १०% टीडीएस काटा जाएगा। थ्रिफ्ट फंड पर ब्याज ४०००० से ज्यादा
होनेपर १०% टीडीएस काटा जाएगा।
प्र
काश दळवी, अध्यक्ष | दत्तात्रेय माने, सचिव | प्रदीप म्हाडगुत, कोषाध्यक्ष|१० ऑगस्ट २१
कर्मचारी संघटनेच्या दि. २६/७/२०२१ रोजी दिलेल्या पत्र क्र. १५ नुसार
आज दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी वसुधारा भवन येथे ऑफशोरला जाणाऱ्या
कामगारांच्या क्वारेंटाईन पिरियड कमी करण्याबाबत मिटींग आयोजित करण्यात
आली होती. सदर सभा ईडी सिडीएस श्री. जयस्वाल साहेब यांच्या
अध्यक्षतेखाली सर्वश्री माथवन साहेब - ईडी एमएच असेट,श्री. रविशंकर
साहेब - ईडी बी अँड एस असेट, श्री. मुजुमदार साहेब - ईडी एन एच
असेट,श्री. प्रसाद साहेब - ईडी ड्रीलिंग,श्री. सुनील सिंग साहेब -
जीजीएम एचआरओ,श्री. राव नावेद साहेब - सीजीएम एचआर, श्री.भाटिया साहेब
- इंचार्ज एचआर एमएच, श्री. संजय लाल साहेब - इंचार्ज एच एन डब्लू,
श्रीमती माधुरी कलीता - इंचार्ज मेडिकल, श्री. विवेक झेने - इंचार्ज
I/R तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री. प्रदीप मयेकर सरचिटणीस,
सर्वश्री पराग कदम, पंकज कोळी व प्रदीप म्हाडगुत उपाध्यक्ष, नवनाथ
टेमकर व विजय भगत सहसरचिटणीस आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत
उपरोक्त विषयावर खालील प्रमाणे चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
१.
ज्यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांच्याबाबत पहिल्या दिवशी
हॉटेलमध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी टेस्ट, तिसऱ्या दिवशी टेस्टचा
निर्णय आल्यावर उपलब्ध क्रुचेंज नुसार त्यांना ऑफशोर मध्ये पाठवण्यात
येईल. या निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२१ पासून करण्याचे निश्चित
करण्यात आले.
२. ज्यांचे दोन लसीकरणाचे डोस झालेले नाहीत त्यांना
आताच्या नियमाप्रमाणे क्वारेंटाईन व्हावे लागेल. दोन डोस पूर्ण
झाल्यावर त्यांना वरील नियम लागू होतील.
३. कोकण व पश्चिम
महाराष्ट्र येथे नुकत्याच आलेल्या पुरस्थितीमुळे ऑफशोरला जाऊ न
शकलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इंचार्ज एचआर यांना थ्रू प्रॉपर चॅनल
रीतसर अर्ज केल्यास सदर कामगारांना स्पेशल कॅज्युअल लिव्ह मंजूर
करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
पच्छिमी अपटत इकाई ओएनजीसी(डब्ल्यू.ओ.यु.) कर्मचारी संघटना मुंबई,
द्वारा सभी ऑफशोअर जाने वाले कर्मियों से जल्द से जल्द कोविड -१९ का
टिका लगवाने का अनुरोध करते हैं l
भवदिय
प्रदिप मयेकर
महासचिव
ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना.
ONGC (WOU)
Karmachari Sanghatana, Mumbai once again request to all the offshore
going employees to get vaccinated at the earliest.
Regards,
Pradeep Mayekar,
General Secratary,
ONGC (WOU) Karmachari Sanghtana.
९ ऑगस्ट २१
मुंऑफशोरला जाताना सर्व स्टाफला हॉटेल लेमन ट्री येथे ७ दिवस
Quarantine व्हावे लागते. मागील महिनाभरात या हॉटेलसंबंधी अनेक तक्रारी
येत होत्या.याबाबतीत कर्मचारी संघटना व्यवस्थापनेशी वेळोवेळी बोलून
त्यांच्यापुढे आपल्या तक्रारी व बाजू मांडत होती. सोमवार दि. ९ ऑगस्ट
२०२१ रोजी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर साहेब यांनी
व उपाध्यक्ष श्री. पराग कदम, श्री. प्रदीप म्हाडगुत, सहसरचिटणीस श्री.
नवनाथ टेमकर,सचिव श्री. जयवंत रसाळ तसेच मा. श्री. सुनील चिटणीस, श्री.
अनिल बागवे व ओएनजीसी व्यवस्थापनातर्फे एच एन डब्ल्यू इंचार्ज श्री.
संजय लाल साहेब यांच्या सोबत हॉटेल लेमन ट्री येथे अचानक भेट देऊन
हॉटेल चे व्यवस्थापक श्री.अभिराम मेनन यांच्याशी मिटींग केली.
त्यांच्याशी खालील मुद्द्यांवर चर्चा करून हॉटेलला निर्देश देण्यात
आले.
१. ब्रेकफास्ट, लंच, डिनर यांच्यात दर्जात्मक सुधारणा करून
फूड पॅक केल्यावर कमीत कमी वेळेत रुमपर्यंत पोहोचेल याबाबत काळजी
घेणे.तसेच फुडमध्ये काही चांगले बदल करावेत. याबाबतच्या सूचना हॉटेल
व्यवस्थापनाने मान्य केल्या.
२. रुममधून फोन आल्यावर तो अटेंड केला
जात नाही असे आढळून येत आहे, त्यात सुधारणा करण्याचे हॉटेल
व्यवस्थापनाने मान्य केले.
३. रूममध्ये पूर्वीप्रमाणेच अधिक टॉवेल,
साबण, लिक्विड सोप आदी ७ दिवस पुरेल इतके ठेवले आहे याची खात्री करून
नंतरच रूम ओएनजीसी कर्मचाऱ्यास वापरण्यास द्यावी.
४. सात
दिवसांमध्ये एकदा पीपीई किट घालून हॉटेल कामगाराने रूम स्वच्छ
करावी.बेडशीट बदलावी.यासाठी ओएनजीसी च्या मेडिकल सेक्शनकडून
पूर्वपरवानगी मिळवावी. न मिळाल्यास दरम्यान अधिक बेडशीट व कव्हर
रूममध्ये ठेवण्यात याव्यात.
सदर सूचना हॉटेल व्यवस्थापनाने
मान्य केल्या, सुधारणा करण्याचे कबूल केले. तसेच युनियनच्या वतीनेही
त्यांना पंधरा दिवसांनी पुन्हा व्हिजिट करणार असल्याचे त्यांना
सांगितले आहे.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष,
ओएनजीसी (WOU)
कर्मचारी संघटना.
मुंबई ऑफशोर मधील कामगारांना फूडबॉक्स संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांबाबत ओएनजीसी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री.प्रदीप मयेकर साहेबांनी दि.०२/०८/२०२१ रोजी न्हावा सप्लाय बेस येथे भेट देऊन न्हावा हेड श्री.सतेंद्र राय साहेब तसेच फूडबॉक्स शी संबंधित समस्यांवर सखोल चर्चा केली.या वेळी फुडबॉक्स कंत्राटदारांचे सुपरवाइजर / मॅनेजर यांना देखिल बोलविण्यात आले होते व त्यांच्याही अडचणी जाणून घेण्यात आल्या.तसेच मयेकर साहेब यांनी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.पराग कदम, श्री.प्रदीप म्हाडगुत व डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री.नवनाथ टेमकर तसेच ओएनजीसी स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष न्हावा सप्लाय बेस श्री.संदीप गावडे तसेच न्हावा कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी श्री.निलेश कोर्लेकर व श्री.पंकज बागुल, श्री.अविनाश मुंबईकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत दिवसभर न्हावा येथे अनेक ठिकाणी पाहणी करून तेथील सध्याच्या फुड बॉक्स भरण्यापासुन ते बोटीत लोड होण्यापर्यंतच्या प्रक्रियेची प्रत्यक्षात सप्लाय बोट मध्ये जाऊन माहिती घेतली. फुड बॉक्स व्यवस्थित हाताळण्याच्या व प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने महत्वाच्या सुचना केल्या.यावेळी अनेक कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांनी मयेकर साहेबांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
सर्व कामगार बंधू भगिनींना कळविण्यात येते की, कर्मचारी संघटनेने
केलेल्या प्रयत्नाअंती आपला वेतन करार अस्तित्वात आला. सर्वांना वेतन
करारातील फरकाचा लाभ मिळाला. आता या फरकामुळे लाभलेली रक्कम bifurcate
करण्यासाठी युनियन प्रयत्नशील होती. या प्रयत्नांना वरिष्ठ
व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून आपल्याला वेतन फरकाची रक्कम
bifurcate करून देण्यासाठी सर्व पीसीएस हेड यांना ई-मेल आलेला आहे.
प्रत्येकाने आपापल्या पीसीएस हेड शी संपर्क साधून बायफरकेशन सर्टिफिकेट
ची सही शिक्क्यासह प्रत घ्यावी.
प्रकाश दळवी (अध्यक्ष)
Request to arrange the meeting for long pending issue of PPE items
and the issues enlisted.
७ जुन २०२१
बंधू आणि भगिनींनो,आज दिनांक ०७/०६/२०२१ रोजी दुपारी
०३:०० वाजता कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस आदरणीय श्री.प्रदीप मयेकर
साहेब,उपाध्यक्ष श्री.पराग कदम साहेब आणि ऑफशोर सेक्रेटरी श्री.नवनाथ
टेमकर साहेब यांनी 11 high लॉगिंग सर्विसेस येथे नवनियुक्त हेड लॉगिंग
सर्विसेस श्री.योगेश बहुखंडी (CGM Geophysics) यांची भेट घेऊन त्यांना
ओव्हरटाईम संदर्भातील बाब लक्षात आणून दिली. मागील वेळेस काही
कारणास्तव मिटिंगला हेड लॉगिंग उपलब्ध नव्हते,त्यामुळे काही तांत्रिक
अडचणी निर्माण होत होत्या. ओव्हरटाईम संदर्भातील प्रलंबित मुद्दा
कर्मचारी संघटनेच्या प्रयत्नातून यशस्वीरित्या निकाली लागला असून, तसे
निर्देश पनवेल येथील संबंधित इंचार्जेसना दिले आहेत.
आम्ही सर्व
लॉगिंग सर्विसेस तर्फे कर्मचारी संघटनेचे आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक
आभार व्यक्त करतो.
धन्यवाद!
कर्मचारी संघटना जिंदाबाद!
पंकज लवेकर
( सहसचिव - पनवेल युनिट )
गणेश पाटील
अशोक गौडा
Helpline numbers Jumbo vaccination camp at ONGC NBP Green Heights.
६ मे २०२१
बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने दिलेल्या १०
मुद्द्यांच्या नोटीसीसंदर्भात दि. ४ मे २०२१ रोजी सहायक श्रम आयुक्त
यांच्याकडे कन्सिलेशन होणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने घोषित
केलेल्या लॉकडाऊन मूळे तसेच आपले इंचार्ज आय आर यांची अचानक आसाम येथे
बदली होऊन तेथे ते रुजू झाल्याने ओएनजीसी तर्फे पुढील तारीख देण्याची
विनंती ओएनजीसी मुंबई विभागातर्फे करण्यात आली. त्यावर सहाय्यक श्रम
आयुक्त यांनी सुनावणीची पुढील तारीख लॉकडाऊन संपल्यानंतर ईमेल द्वारे
ओएनजीसी व युनियन यांना कळविण्यात येईल असे आपल्याला फोनद्वारे कळविले
आहे.
सर्वांनी याची नोंद घ्यावी.
प्रदीप म्हाडगुत
सचिव.
२० एप्रिल २०२१
बंधू आणि भगिनींनो,
आज दिनांक २०/०४/२०२१
रोजी कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. सुनील चिटणीस, सहसचिव श्री.
राजेंद्र मोरे आणि इतर पदाधिकारी यांनी ED-HDS श्री.आहुजा साहेब यांची
भेट घेतली आणि त्यांना Logging, Well services, Cementing, Chemistry
इत्यादींशी संबंधित सर्व सेक्शनल हेड ना OT संदर्भात सूचना देण्यास
सांगितले आहे.
वरील सर्व सेक्शनल हेड ना OT संदर्भात आजच सूचना
देण्यात येतील असे श्री.आहुजा साहेबांनी आश्वासित केले.
त्यानंतर
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री.पी.व्ही.रमेश Head-DFS, Chemestry आणि
श्री अंशुमन दास LMCS, Head-Cementing यांचीही भेट घेऊन OT संदर्भात
झालेला निर्णय त्यांना सांगण्यात आला. तसेच Incharge-Logging आणि
Incharge- Work over ऑफिसमध्ये अनुपस्थित असल्याने त्यांची भेट होऊ
शकली नाही.
वरील सेक्शन मधील सर्व कर्मचाऱ्यांनी याची नोंद
घ्यावी आणि आपापल्या इन्चार्ज कडून त्यांना OT संदर्भात सूचना आल्यात
की नाही ते निश्चित करून घ्यावे.
या संदर्भात काही शंका असल्यास
कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
प्रदीप म्हाडगुत,
नवनाथ टेमकर
सचिव.
०९ एप्रिल २०२१
२३:३५
कामगार बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक
०१ मार्च २०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख
मागण्यांपैकी Issue No.1 च्या अनुषंगाने OT (Over Time) चा प्रलंबित
मुद्दा निकालात काढला असून, मुंबई व्यवस्थापनाच्या Asset चे सर्व ED,
GGM-HRO, HDS , CGM - I/c IR, CGM - ER Services, CGM - I/c HR ER - MH
Asset यांची आज दिनांक ०९.०४.२०२१ रोजी Video conferencing पार पडली.
मान्य झालेल्या मागणीनुसार १२/०४/२०२१ नंतर चालू Duty Pattern
प्रमाणे १४ दिवसानंतर पुर्ण केलेल्या दिवसांचा क्लेम करावा, तो संपुर्ण
OT (Over Time) मंजूर होईल व मार्च २०२० पासून कर्मचारी १४ दिवसानंतरचा
OT Claim करतील, तसेच या कालावधीतील १४ दिवसानंतरच्या OT सोबत अनमॅन चा
OT, १२ तासानंतरचा OT व National Holiday चा OT क्लेम करावा, परंतु २१
दिवसांनंतरचा OT व Duty Period मधील इतर ओटी व्यवस्थापन मंजूर करेल.
१/३ पेक्षा जास्त OT चे तास असल्याने Asset Manager,L1
Authority कडे OT चे forms Approve करण्यासाठी पाठवण्यात येतील व
त्यानुसार कार्यवाही चालू झाली आहे.संबंधित Rig व Platforms च्या
अधिकार्यांकडे OT Forms भरून जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रमुख मागणी मान्य झाल्याने कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास
Strike Notice संदर्भात दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी दिलेला Action
Programme तूर्त स्थगित करत आहे.आपण आपले कार्य जोमाने पूर्ववत करावे.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस,
०९ एप्रिल २०२१
कामगार बंधू आणि भगिनींनो,
कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक ०१
मार्च २०२१ रोजी दिलेले पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख
मागण्यांपैकी Issue No.5 ची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत गेल्या तीन
दिवसात दोन ECC मीटिंग घेऊन Field Operator च्या पे रिविजन चा प्रलंबित
मुद्दा निकालात काढला असून येत्या एक-दोन दिवसात सदर Order
व्यवस्थापनातर्फे जारी करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस,
०७ एप्रिल २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज दि. 7 एप्रिल 2021
रोजी श्रम आयुक्तांच्या कार्यालयात आपल्या स्ट्राईक नोटीस संबंधात
कन्सलिएशन मिटींग होती. सदर मिटींगला कर्मचारी संघटनेच्या वतीने
उपाध्यक्ष श्री. पराग कदम, सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, सचिव श्री.
प्रदीप म्हाडगुत उपस्थित होते, तर व्यवस्थापनाच्या वतीने इंचार्ज आय आर
श्री. गणेशन साहेब व दक्ष साहेब उपस्थित होते. ओटी या विषयावर भाष्य
करताना युनियनने कालच झालेल्या सभेतील निर्णय सांगितला. तर
व्यवस्थापनाच्या वतीने असे सांगितले की काल जरी निर्णय झाला असला तरी
मिटिंगनंतर हेड क्वार्टर वरून आलेल्या नवीन ऑर्डरमुळे आम्ही यानंतर 14
दिवसांऐवजी 21 दिवसानंतरच ओटी देऊ. त्यामुळे कालच्या सभेतील निर्णयाची
अमलबजावणी आम्ही करू शकणार नाही. व इतर विषयांवर हेड क्वार्टर वरून
विचार सुरू आहे एवढेच कळविले आहे.
त्यावर खूप वादविवाद होऊन श्रम
आयुक्तांनी पुढील सुनावणी 4 मे रोजी निश्चित करून मिटींग संपविली.
कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यानंतर त्वरित ईडी एम एच असेट
श्री. पांडेसाहेब व इंचार्ज एचआर श्री. नावेद राव साहेब यांची भेट
घेण्याचे ठरविले. व वसुधारा भवन येथे जाऊन त्यांची भेट घेऊन घडलेल्या
घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. चर्चेदरम्यान या गोष्टी डायरेक्टर
टी अँड एफ एस श्री. ओ पी सिंग साहेब यांच्याशी सरचिटणीस श्री. प्रदीप
मयेकर यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून मुंबईचे महत्व व येथील
परिस्थिती त्यांना सांगितली. व त्यांचेकडून मुंबईसाठी निर्देश घेतले.
या सर्व घडामोडीचे साक्षीदार उपस्थित ईडी असल्याने सर्व की
एक्झिक्युटिव्हजना योग्य ते संकेत मिळाले व उद्या इसीसी होऊन आपल्याला
पूर्वी मिळालेले निर्णय घोषित होतील असे निश्चित झाले.
यानंतर सर्व
गोष्टींची कल्पना ११ हाय येथे जाऊन ईडी एचडीएस श्री. आहुजा साहेब यांना
देऊन सर्व वृत्तांत सांगितला. त्यांनी याची खात्री करून त्वरित सर्व
रिगच्या OIM यांना योग्य ते निर्देश दिले.
उद्याच्या मिटिंगनंतर
सदर ऑर्डर आल्यानंतर चालू ड्युटीच्या 14 दिवसानंतर पुर्ण केलेल्या
दिवसांचा क्लेम करावा, तो संपुर्ण ओटी मंजूर होईल. व मार्च 2020 पासून
या निघणाऱ्या ऑर्डरच्या तारखेपर्यंत कर्मचारी 14 दिवसानंतर ओटी क्लेम
करतील, तसेच या कालावधीतील 14 दिवसानंतरच्या ओटीसोबत अनमॅन चा ओटी, 12
तासानंतरचा ओटी व नॅशनल हॉलिडेचा ओटी क्लेम करावा, परंतु 21
दिवसांनंतरचा ओटी व ड्युटी पिरियडमधील इतर ओटी व्यवस्थापन त्वरित मंजूर
करेल. उरलेल्या 7 दिवस शिल्लक ओटी संदर्भात श्रम आयुक्तांसोबतच्या
मिटींगमध्ये नंतर निर्णय होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
०६ एप्रिल २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज
दि. 6 एप्रिल 2021 रोजी वसुधारा भवन येथे मुंबई विभागाच्या की
एक्झिक्युटिव्हज सोबत मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेची मिटींग झाली.
सदर मिटींग श्री. के. पी. पांडेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली होऊन श्री.
माधवन साहेब, श्री. नमित शर्मा साहेब, श्री. ढोबल साहेब, श्री. प्रसाद
साहेब, एचआरओ श्री. सुनील सिंग साहेब, श्री. नावेद राव साहेब, आयआर
श्री. गणेशन साहेब व कर्मचारी संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष श्री. पराग
कदम, सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, सचिव श्री. प्रदीप म्हाडगुत, पंकज
कोळी, सुनील चिटणीस तसेच जयवंत रसाळ, श्रेयस जोरापूरकर आदी पदाधिकारी
उपस्थित होते. सदर सभेत खालील निर्णय घेण्यात आला.
येत्या एकदोन
दिवसात मुंबई रिजन तर्फे ड्युटी संदर्भात एक ऑर्डर काढली जाईल.
सदर
ऑर्डर आल्यानंतर चालू ड्युटीच्या 14 दिवसानंतर पुर्ण केलेल्या दिवसांचा
क्लेम करावा, तो संपुर्ण ओटी मंजूर होईल.
मार्च 2020 पासून या
निघणाऱ्या ऑर्डरच्या तारखेपर्यंत कर्मचारी 14 दिवसानंतर ओटी क्लेम
करतील, तसेच या कालावधीतील 14 दिवसानंतरच्या ओटीसोबत अनमॅन चा ओटी, 12
तासानंतरचा ओटी व नॅशनल हॉलिडेचा ओटी क्लेम करावा, परंतु 21
दिवसांनंतरचा ओटी व ड्युटी पिरियडमधील इतर ओटी व्यवस्थापन त्वरित मंजूर
करेल. उरलेल्या 7 दिवस शिल्लक ओटी संदर्भात श्रम आयुक्तांसोबतच्या
मिटींगमध्ये नंतर निर्णय होईल.
यामुळे आपला वर्क टू रुल हा घोषित
कृती कार्यक्रम सदर ऑर्डर आल्यानंतरच माघारी घेण्यात येईल व तसे आपणा
सर्वांस कळविण्यात येईल.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
०१ एप्रिल २०२१
कामगार बंधू आणि भगिनींनो,
दिनांक ३१.०३.२०२१
रोजी ओएनजीसी व्यवस्थापनाने जारी केलेली Office Order No.:- DDN/
Corp-ER/Estt-Policy/2021/Payment/768249 OFFICE ORDER (07/2021)
द्वारे देऊ करत असलेली रक्कम ही Incentive स्वरूपाची असून, आपण
केलेल्या OT (Over Time) चा याच्याशी संबंध नाही.
OT(Over Time)
संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
कर्मचारी संघटनेने
व्यवस्थापनास Strike Notice संदर्भात दिनांक ०१ मार्च २०२१ रोजी दिलेले
पत्र क्रमांक ONGC/KS/91/2021 मधील प्रमुख मागण्या जोपर्यंत मान्य होत
नाही तोपर्यंत Action Programme स्थगित न करता तो अजून उत्स्फूर्त व
उग्र करण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे.याची सर्वांनी नोंद
घ्यावी.
दिनांक ०७ एप्रिल २०२१ रोजी सहाय्यक श्रम आयुक्त (ALC)
यांस कडून कर्मचारी संघटना व व्यवस्थापना सोबत नियोजित Conciliation
Proceedings नंतर आपणास योग्य ती कार्यवाही त्वरित कळविण्यात येईल.
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस.
Payment to field going employees acknowlegeing their contribution
during COVID-19 pandemic.
२३ मार्च २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
काल दिनांक
२२.०३.२०२१ रोजी मुंबई विभागाचे जीजीएम एचआरओ - श्री.सुनील सिंग साहेब,
इंचार्ज मेडिकल - प्रणिता दास मॅडम व ओएनजीसी (WOU) कर्मचारी संघटना
यात झालेल्या चर्चेनुसार मुंबई विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले
असून उद्या दि. २४ मार्च २०२१ पासून स. १० ते संध्या. ६ पर्यंत बीकेसी
कोवीड लस सेंटर येथील गेट क्र. ९ (9) येथे फक्त ओएनजीसी
कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. दररोज ५०० कर्मचाऱ्यांना
त्या ठिकाणी लस देण्याची क्षमता निर्धारीत करण्यात आली आहे. लस घेण्यास
जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे आय कार्ड व आधार कार्ड सोबत नेणे
अनिवार्य आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आपल्या सर्वांच्या
माहितीसाठी
प्रदीप मयेकर,
सरचिटणीस
Action programme continue Circular.
२२ मार्च २०२१
कर्मचारी बंधू भगिनींनो,
आज दि. २२ मार्च रोजी
व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनेला सर्व इडींच्या उपस्थितीत मिटींगसाठी
वसुधारा भवन येथे बोलावले होते. स्थितीचा आढावा घेऊन व्यवस्थापनाने
आजपासून सुरू झालेले आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. सोबत आमचे
हेड क्वार्टरशी बोलणे सुरू आहे व याबाबत मार्ग निघेल असे आश्वासनही
दिले.
मात्र कर्मचारी संघटनेने सुरू असलेल्या आंदोलनाची
अपरिहार्यता व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली. १४ दिवसांनंतरचा OT
घोषित करा, इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घ्या. त्यानंतरच आम्ही
आंदोलन मागे घेऊ, असे ठामपणे सांगितले.
आजच्या सभेत सर्व ईडीज,
जिजीएम एचआर सुनील सिंग साहेब, सीजीएम एचआर नावेद राव साहेब, सीजीएम आय
आर गणेशन साहेब, कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष पराग कदम, सरचिटणीस
प्रदीप मयेकर, सचिव प्रदीप म्हाडगुत, नवनाथ टेमकर, पंकज कोळी आदी
पदाधिकारी उपस्थित होते.
आज २२ मार्च दिनी ऑफशोर मधील सर्व
इनस्टॉलेशनवर एकजुटीने आपला अॅक्शन प्लान १००% यशस्वी केल्याबद्दल मी
सर्व कामगारांचे हार्दिक अभिनंदन करतो.
प्रकाश दळवी,
अध्यक्ष
१९ मार्च २०२१
बंधू आणि भगिनींनो,
युनियनने दिनांक ०१/०३/२०२१ रोजी दिलेल्या नोटीस नुसार ऑफशोरमध्ये
दिनांक २२/०३/२०२१ रोजी 14 दिवस वा त्यापेक्षा जास्त दिवस झालेल्या
कामगारांनी माइन्स एक्ट नुसार चौदा दिवस ऑफशोर ड्यूटी नंतर ७ दिवस
विश्रांती घ्यावी. यासाठी आपणा सर्वांना नमुना पत्र खाली दिल्याप्रमाणे
एक अर्ज OIM कड़े द्यायचा आहे.
अशा कर्मचाऱ्यांना १४ दिवसांनंतर
हेलीबेसला आणण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे अन्यथा कर्मचारी रिग व
प्लॅटफॉर्मवरच ७ दिवसांची विश्रांती घेतील. ७ दिवसांच्या विश्रांतीनंतर
कामगार ८ व्या दिवशी काम सुरू करतील.ज्या कामगारांना 14 दिवसांच्या
ड्युटी नंतर उतरवण्यात येईल त्यांनी आपल्या चौदा दिवसांचा ऑफ घेऊनच
पुढील ड्युटी जॉईन करावी.
आपल्या नोटीस मध्ये जाहीर केलेल्या
कार्यक्रमानुसार आपण माइन्स एक्ट मधील तरतुदीनुसार काम करणार आहोत याची
सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.
प्रदीप मयेकर
सरचिटणीस
Sample Applicaton letter word format.
Sample Applicaton letter PDF format.
DY. CLC (C) letter to ONGC Chairman on 18 March 2021.
स्ट्राइक नोटिस अॅक्शन प्लॅन व माहिती.
Circular - Uran & Hazira Plant employees submit overtime forms.
Union meeting and decisions on vaccination of offshore going
employees.
Minutes of meeting Karmachari Sanghatana and ONGC Key Management
Executives held on 05 March 2021.
Strike Notice pending issues since last five years 11th March 21 to
22nd March 2021.
5 मार्च 2021
आपण दिलेल्या स्ट्राईक
नोटीस संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आज दि. ५ मार्च २०२१ रोजी
व्यवस्थापनाने मिटींग आयोजित केली होती. सदर मिटींग मुंबई विभागाच्या
आय आर तर्फे कर्मचारी संघटना व सर्व इडींच्या उपस्थितीत घेण्यात आली.
आपल्या नोटीसमध्ये लिहिल्याप्रमाणे सर्व इश्यूवर चर्चा करण्यात आली.
युनियनतर्फे आपल्या सर्व मागण्यांचे आपण ठाम राहून समर्थन केले.
युनियनच्या १४ दिवसांच्या ड्युटीच्या आग्रही मागणीवर विचार करताना
महाराष्ट्रातील कोरोनाबतच्या सद्य परिस्थितीचा विचार करून
व्यवस्थापनाने ऑफशोर कामगारांना तात्काळ दिलासा म्हणून २१ दिवसांचा
ड्युटी पिरियड करण्याचे ठरविले. मात्र युनियनने १४ दिवसांचीच ड्युटी
पिरियड हवा असे आग्रही प्रतिपादन करून येणाऱ्या काळात यावर विचार
करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. सोबत क्वारेंटाईन पिरियड कमी
करण्यासाठी सोमवारी दुपारी मिटींग आयोजित करण्याचे व्यवस्थापनाने मान्य
केले.
१४ दिवसानंतर ओव्हरटाईम देण्याबाबत व सिपीपी संदर्भात मागील
केसेस पुन्हा ओपन करण्यासाठी हेड क्वार्टरशी चर्चा करण्याचे
व्यवस्थापनाने मान्य केले व त्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित
करण्यासाठी युनियनने आग्रह धरला. व २२ मार्चपूर्वी सदर मिटींग आयोजित
करण्यासाठी विनंती केली.
ऑफशोर अलाऊन्स, सेल्फ लीज, टेन्यूअर
कामगारांचे इश्यू व इतर मुद्द्यांबाबत लवकरच वरिष्ठ व्यवस्थापनाशी
चर्चा करून आपल्या युनियन सोबत मिटींग घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य
केले आहे.
तसेच युनियनतर्फे आमचा ऍक्शन प्रोग्रॅम ठरविल्याप्रमाणेच
होईल याची कल्पना व्यवस्थापनाला देण्यात आली, याची सर्वांनी नोंद
घ्यावी.
धन्यवाद,
प्रदीप मयेकर
सरचिटणीस
26 FEB 2021
आज दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी कामगारांच्या Over Time
(OT) बाबत Assistant Labour Commissioner यांच्या कार्यालयात दुपारी
३:०० वा. कन्सिलेशन मिटींग झाली. या मीटिंगमध्ये व्यवस्थापनातर्फे
श्री. गणेशन साहेब,I/c - I.R. व त्यांचे सहकारी श्री. दक्ष साहेब
उपस्थित होते. कर्मचारी संघटनेतर्फे सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर
साहेब, उपाध्यक्ष श्री. पराग कदम व ऑफशोर सेक्रेटरी श्री. प्रदीप
म्हाडगुत उपस्थित होते.
या मिटिंगमध्ये कर्मचारी
संघटनेतर्फे कामगारांनी १४ दिवसांनंतर ७० ते ८० दिवसांपर्यंत सलग काम
केल्याचे नमूद केले व OT चा मोबदला मिळणे हा त्यांचा मूलभूत व कायदेशीर
अधिकार असताना व्यवस्थापन OT देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लेबर
कमिशनर यांना सांगितले. मुंबई व्यवस्थापनाने दि. २३ जाने. २०२१ रोजी
मुंबई येथे झालेल्या तिन्ही मिटिंगचा रिपोर्ट हेड क्वार्टर ला
पाठवल्याचे नमूद गेले. तेथून आज आलेले उत्तर लेबर कमिशनर यांना सादर
केले. त्याची फोटोकॉपी यासोबत देत आहोत. या उत्तरावर कर्मचारी
संघटनेतर्फे तीव्र आक्षेप घेतला व आजही हेड क्वार्टर वरून Over Time
देण्याबाबत कोणत्याही सूचना येत नाहीत. याबाबत चर्चा होऊन पुढील
मीटिंगमध्ये हेड क्वार्टर वरून अधिकारी बोलावण्याबाबत लेबर कमिशनर
यांनी निर्णय घेतला. त्यानुसार ईडी चीफ ईआर यांना लेबर कमिशनर यांनी
नोटीस देऊन बोलविण्याचे निश्चित केले. पुढील सुनावणी दि. ७ एप्रिल २०२१
रोजी सकाळी ११:०० वाजता निश्चित करण्यात आली.
प्रदीप म्हाडगुत
ऑफशोर सेक्रेटरी,
ओएनजीसी (WOU) कर्मचारी
संघटना, मुंबई.
Letter by management in over time dispute consiliation procedings on
26th Feb 2021.
Shiv jayanti NQO
|