Font Problem

   

पेट्रोलियम एन्ड गैस वर्कस फ़ेडरेशन ऑफ़ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्थानिय लोकाधीकार महासंघाचे उपाध्यक्ष श्री प्रदीप मयेकर यांच्या ५० व्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दीक शुभेच्छा.

     श्री प्रदीप अनंत मयेकर यांचा जन्म दिनांक २८/०९/१९५७ रोजी मुंबई मध्ये गिरगाव या ठिकाणी झाला. समाजकारण / राजकारण याचे बाळकडू असलेल्या गिरगावात शालेय शिक्षण संपताच शिवसेना हिंदूहृदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे याच्या विचाराने प्रेरीत होऊन सुर्यमहल या ठीकाणी असलेल्या शिवसेना शाखा क्रमांक १४ या ठीकाणी शिवसेना नगरसेवक श्री गजानन वर्तक यांच्या मार्गदर्शना खाली पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. पक्षाचे कार्य शालेय जीवनात सुरु असतानाचा सन १९८२ साली बॉम्बे टेक्नीकल स्कूल ऑफ़ इंजिनियर, आंग्रेवाडी, गीरगाव या संस्थेवर संचालक होण्याचा मान मिळाला व स्वतः या ठिकाणी अघ्यापन करुन ब-याच बेरोजगारांना तात्रिंक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडले.  

     शालेय शिक्षण पूर्ण होताच सन १९८३ साली ओएनजीसी अस्थापनामध्ये नोकरी मिळाली. ओएनजीसीत नोकरी करत असताना मेकॅनिकल इंजिनियरींगची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. शिवसेना नेते श्री सुधीर भाऊ जोशी व आमदार श्री गजानन कीर्तीकरांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय लोकाधीकार समितीची स्थापना करण्यात आली. सदर समितीच्या सरचीटणीस पदी श्री मयेकरांची नियूक्ती करण्यात आली. ओएनजीसीतील आपल्या इतर सर्व सहकार्यांच्या सहाय्याने विविध आंदोलने छेडीत स्थानिक भुमिपुत्रांना नोकरी मिळऊन देण्यात समिती शंभर टक्के यशस्वी झाली. उरण/पनवेल या ठिकाणी असलेल्या ओएनजीसी कार्यालयात भूमीपुत्रांना नोकरी मिळऊन देण्यात सिंहाचा वाटा श्री प्रदीप मयेकर व इतर सहका-याचा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्व कार्यप्रणाली मुळे अल्पावधीत शिवसेना नेते सुधीर भाऊ जोशी यांनी सन १९८३ साली स्थानिय लोकाधीकार समिती महासंघाच्या चिटणीसपदाची जबाबदारी दीली व सन १९८७ सालापासून आजपर्यंत उपाध्यक्ष या पदावर काम करीत आहेत. उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना अन्य अस्थापनेत म.रा.वि. मंडळ, खादी ग्रामोद्योग तसेच बी.एस.ई.एस. या ठीकाणी समिती स्थापन करुन समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सुद्धा यशस्वीपणे साभाळली. जम्मू काश्मीत बॅंकेमध्ये सुध्दा अविरत लढा देऊन १६ कामगारांना कायम सेवेत रुजु करुन घेतले.

     स्थानीय लोकाधीकार समीती महासंघाद्वारे शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांच्या मार्गदशना खाली शिवसेना पक्षाचा वटवृक्ष वाढवीण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये प्रचार कार्यास सुरुवात केली. परंतु तालुका संपर्क प्रमुख पदापासुन आजपर्यंत जालना, औरंगाबाद, जिल्ह्यात काम करत असताना नागपूर व वर्धा जिल्हा संर्पक प्रमुख म्हणून अत्यंत प्रामाणीकपणे व निस्वार्थीपणे शिवसेना पक्षाचे कार्य शिवसेना कार्यकारी प्रमुख माननीय श्री उध्दवसाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत. शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व स्थानीय लोकाधीकार समिती महासंघाच्या अधिवेशनाची जबाबदारी सर्मथपणे सांभाळली.

     स्थानीय लोकाधीकार समीतीच्या कार्याबरोबरच ओएनजीसी मध्ये सन १९८६ साली     ओएनजीसी (बीओपी) कर्मचारी संघटनेची स्थापना करुन आजपर्यंत संघटनेची संघटनेच्या सरचीटणीसपदी अविरत कार्यरत आहेत. सदर संघठनेच्या माध्यमातूनच ओएनजीसी एम्प्लॉईज को. ऑ. क्रेडिट सोसायटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुध्दा समर्थपणे सांभाळीत आहेत. या आर्थीक वर्षात क्रेडिट सोसायटीने आर्थीक नफ़ा एक कोटी पर्यंत करण्यात यश मिळवले. ओएनजीसी मधील कंत्राटी कामगार, अथवा असंघटीत कामगारांचे प्रश्न सोडवीण्यात त्यांचा नेहमीच सिंहाचा वाटा असतो. ओएनजीसी मधील कर्मचा-यांनी आपला जाहीर सत्कार दि. ५/२/२००० रोजी करुन आपल्यास मारुती झेन प्रदान करुन आपल्या प्रेमाची पोचपावती दिली होती.

     आज आपण पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत असतांना आपल्या सारख्या कामगार नेत्याने कोणत्याही आर्थिक पाठबळाशीवाय केलेली सेवा खरोखरच आम्हां ओएनजीसीवासीयांना अभिमानास्पद आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता शिवसेना प्रमुख व शिवसेना कार्यकारी प्रमुखांचा आदेश शिरसावंद्य मानून दुर्बल धटकांसाठी नोक-या अथवा सामाजिक सेवेचे व्रत आपल्या हातुन धडण्यासाठी आपणांस व आपल्या कुटुंबाचे दीर्घ, निरामय आणि सुखी आयुष्य लाभो हीच परमेश्वराकडे प्रार्थना करीत भावी कार्याबद्दल आम्हां ओएनजीसीवासीयांतर्फ़े हार्दिक शुभेच्छा!

 
 
      प्रकाश दळवी
     अध्यक्ष                            दिनांक २८/०९/०६

     ओएनजीसी बीओपी

     कर्मचारी संघटना

.